पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण आपघात

391 0

पुणे: पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत होणारे व्यक्ती हे एकाच कुटुंबातील सदस्य होते. चुकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्या मध्ये आल्याने कारची ट्रकला धडक बसून हा अपघात झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव एमआयडीसी येथील एलजी कंपनीसमोरून एक मोठा कंटेनर उलट दिशेने येत होता. तर, ईको कार नगरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे. मयत कुटुंब नगरमधील लग्नकार्य आटपून पुन्हा पनवेलकडे निघाले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यामध्ये तीन लहानमुलांचा समावेश असून, त्यांचे वय 14 वर्षे, 7 वर्षे आणि एक चार वर्षीय चिमुकलीचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!