Rahul Narvekar

Disqualified MLA : आमदारांच्या अपात्रेसंदर्भात नार्वेकरांनी बोलावली तातडीची बैठक; काय घडणार नेमके?

1003 0

मुंबई : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात (Disqualified MLA) मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात (Disqualified MLA) चर्चा होणार असल्याचे सध्या समोर येत आहे. शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांकडून लेखी उत्तर मिळाल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे.

Mumbai – Pune Highway : पुण्यावरुन मुंबईला येणारी वाहतूक आज दुपारी होणार बंद ; काय आहे नेमके कारण?

या बैठकीमध्ये किती आमदारांनी नोटीसला उत्तर दिलं आणि किती आमदारांनी मुदतवाढ मागितली याचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे या बैठकीनंतर अपात्र आमदारांना लवकरच सुनावणीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर (Disqualified MLA) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी बैठक बोलावली आहे. शिवसेनेच्या मूळ घटनेचा अभ्यास करून या प्रकरणावर निर्णय घेतला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवली आहे. ती मिळताच त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!