Solapur-Tuljapur Highway

Solapur-Tuljapur Highway : तुळजापूर-सोलापूर महामार्ग 3 दिवस राहणार बंद

1595 0

धाराशिव : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर – सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत हा महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

तुळजापुरातील शारदीय नवरात्र महोत्सव 6 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर रोजी कालावधीत पार पडणार आहे. या काळात देशभरातून आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मोठी गर्दी असते. या सगळ्यांचा आढावा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी विभागनिहाय यंत्रणेकडून घेतला. या महोत्सवासाठी गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन, मंदिर प्रशासन व तुळजापूर नगरपालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तुळजापूर-सोलापूर मार्गावरील वाहतूक गर्दीमुळे 27 ते 29 ऑक्टोबरदरम्यान बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता या महामार्गावरुन बुधवार ते शुक्रवारपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

Share This News
error: Content is protected !!