Devendra Fadanvis Tension

भाजपचा ‘हा’ आमदार फडणवीसांवर नाराज; पत्राद्वारे व्यक्त केली नाराजी

628 0

मुबई : भाजपचे आमदार दादाराव केचे (Dadarao Yadaorao Keche) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पत्राद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटकातील (Karnatak) पराभव हा निष्ठावंतांना डावलल्याचा परिणाम असल्याचे सांगत भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

कर्नाटकातील भाजपचा पराभव हा निष्ठावंतांना डावलल्याने झाला आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे कामे केलीत, अनेक वर्षे झटून पक्ष उभा केला, अशांना डावलल्याने ही परिस्थिती ओढवली. उपऱ्यांना प्राधान्य दिले. यातून पक्षाने बोध घेतला पाहिजे, अशी खदखद त्यांनी व्यक्त केलीं आहे.

Share This News
error: Content is protected !!