Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : पती-पत्नी अन् चिमुकल्याला मोकाट गायीच्या कळपाने तुडवलं

1176 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मोकाट गायींच्या हल्ल्यामध्ये एक दाम्पत्य आणि चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. मोकाट गायींनी दाम्पत्याला तुडवलं आहे. ही संपूर्ण धक्कादायक घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
एक कुटुंब रस्त्यानं स्कुटीवरून जात होते, कुटुंब दुचाकीवरून जात असतानाच समोरून येणाऱ्या गायीच्या कळपानं या कुटुंबावर अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर हे कुटुंब वाहनावरून खाली पडले. खाली पडल्यानंतर गायींनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत पती-पत्नी आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, बीबी का मकबरा परिसरात असलेल्या मोदी हिल कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या परिसरामध्ये गायींची दहशत निर्माण झाली असून, प्रशासनानं मोकाट गायींचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!