Corona News

Corona News : कोरोना परत आला ! ‘या’ जिल्ह्यात आढळला कोरोनाचा रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर

1291 0

सांगली : 2-3 वर्षांपूर्वी कोरोनाने (Corona News) महाराष्ट्रासह संपूर्ण जगात थैमान घातले होते. त्यामुळे लोकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. हे सगळे आता सगळं सुरळीत सुरु असताना आता कोरोनाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.

या रुग्णावर सध्या मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खोकला आणि धाप लागत असल्याने तो मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्या ठिकाणी त्याची आरोग्य तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. मिरज रुग्णालय प्रशासनाकडून सदर रुग्णास कोव्हिड विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कोरोनाची लक्षण काय?
थंडी वाजून ताप वाढणे, सर्दी, सतत खोकला ही प्राथमिक लक्षणं आहेत.
तोंडाची चव जाणे, कोणत्याही गोष्टीचा वास न येणे हे देखील कोरोनाचे लक्षण आहे.
14 दिवसांदरम्यान रुग्णांमध्ये कोरोनाची वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात.
यामध्ये थकवा, श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणे, स्नायू दुखते या समस्यांचा समावेश आहे.
घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, अतिसार, त्वचेवर पुरळ, डोळे लाल होणे आणि हात आणि बोटांचा रंग बदलणे ही देखील कोरोनाची लक्षणं आहेत.

यासाठी कोणती काळजी घ्याल?
बाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करा
सॅनिटायझरचा वापर आवश्य करा
ज्यांना शक्य आहे त्यांनी हात धुवत राहा
कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येणं टाळा
बाहेरुन आल्यावर अंघोळ करा, कपडे, वस्तू सॅनिटाइझ करा.

Share This News
error: Content is protected !!