eknath shinde

मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, राजभवनावर केले इमर्जन्सी लँडिंग

427 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांचे राजभवनावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होण्याची ही काही पहिली वेळ नाही याअगोदरदेखील बुलढाण्याला जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॅाप्टरचे राजभवन हेलिपॅडवर इमर्जन्सी लॅंडिग करण्यात आले.

यावेळी त्या हेलिकॉप्टरमध्ये एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोहियो मंत्री संदिपान भूमरे हे होते. हेलिकॅाप्टरच्या ए सी मध्ये बिघाड झाल्यामुळे तो बंद पडला. त्यामुळे हेलिकॅाप्टर पुन्हा राजभवनच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सातारा – पाटण दौऱ्यावर आहेत.

हेलिकॉप्टरच्या एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे ते दुरुस्तीसाठी राजभवनच्या हेलिपॅडवर उतरवले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची दुरुस्ती युद्धपातळीवर केली जात असून लवकरच ते दुरुस्ती होऊन पुन्हा उड्डाण करताना दिसणार आहे.

Share This News
error: Content is protected !!