कोरोनाच्या कॉलर ट्यून पासून होणार लवकरच नागरिकांची सुटका

421 0

सतत फोनवरून ऐकू येणाऱ्या कोरोना कॉलर ट्यूनला लोकं हैराण झाले आहेत. कोरोना कॉलर ट्यूनमुळे इमरजेंसीच्या काळात फोन करताना वेळ लागत आहे. या कोरोना कॉलर ट्यूनमुळे हैराण असलेल्या लोकांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे.

जवळपास दोन वर्षानंतर आता कोरोना कॉलर ट्यूनपासून लोकांची सुटका होणार आहे. सरकारने कोरोना कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लवकरच फोनवर ऐकू येणारी कोरोना कॉलर ट्यून आता बंद होणार आहे. कोरोनाबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी सरकारने ही कॉलर ट्यून सुरू केली होती. आता दोन वर्षांनंतर सरकारने ही कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

Share This News
error: Content is protected !!