CM EKNATH SHINDE

CM Eknath Shinde : अजित पवारांच्या बंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

478 0

मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह डझनभर आमदारांनी बंडखोरी केली आहे.या सगळ्या घडामोडीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut : अजित पवारांच्या बंडावर ठाकरे गटाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
‘राज्यामध्ये आज अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी आमदार यांनी आपल्या शिवसेना-भाजप युतीच्या डबल इंजिन सरकारला विकासासाठी साथ दिली आहे. अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विकासाच्या राजकारणाला विकासाच्या माणसाने साथ दिली आहे.

Raj Thackeray : अजित पवारांच्या बंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

कतृत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेव्हा अशा घटना घडत असतात, हे आपण आधीही पाहिलं आहे. डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिन जोडलं आहे. राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचा फायदा मिळेल, राज्याचा विकास वेगाने होईल’, असा विश्वासदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Share This News
error: Content is protected !!