Eknath Shinde

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

4106 0

मुंबई : 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन (Pension) योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.विधानसभेच्या दोन्ही सभागृहात निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्तीवेतनाच्या 60 टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतन देणारी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्ती झालेल्या सुमारे साडेआठ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!