Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’;राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली हमी

690 0

मुंबई : उस्मानाबाद आणि औरंगाबाद या दोन जिल्हांच्या नामांतराचा (Chhatrapati Sambhajinagar) वाद मुंबई उच्च न्यायालयात आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम सुनावणी होईपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाही अशी आशा न्यायालयाने व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यसरकार अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव (Chhatrapati Sambhajinagar) वापरणार नाही अशी हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे.

Sanjay Kakde : माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ! कर्ज बुडविल्याप्रकरणी कोर्टाकडून कंपनीचे शेअर्स विकण्याचे आदेश

राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्हांच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जिल्हांच्या नामांतराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. जोपर्यंत न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत जिल्हांची जुनीच नावे वापरण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते . त्यानंतर महाअधिवक्ता यांनी बदलेली नावे वापरणार नसल्याचे असे स्पष्ट केले होते.

Pune Police News : सदाशिव पेठमध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस हवालदारासह 3 जण निलंबित

परंतु असे असलं तरीही कर्मचारी बदललेल्या नावाचाच वापर (Chhatrapati Sambhajinagar) करत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. महाअधिवक्ता यांनी याआधी स्पष्ट केले असतांना देखील, जर कर्मचारी नवीन नाव वापरत असतील तर ती प्रशासनाची कमजोरी आहे. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!