eknath shinde

Cabinet Meeting : दिवाळीनंतर पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

1542 0

मुंबई : आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. चला तर मग पाहूयात कोणते निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले संक्षिप्त निर्णय
✅ मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार

✅ राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला; बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ

✅ आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता

✅ राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!