Breaking News

बुलडाणा की बुलढाणा ? जिल्हा प्रशासनाने केला संभ्रम दूर आता ‘असाच’ उल्लेख करा

267 0

बुलढाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहराच्या नावाचा संभ्रम आता दूर झाला आहे. बुलडाणा नव्हे तर बुलढाणा लिहिणे अनिवार्य असल्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

एके काळी या शहराचं नाव भिलढाणा होते. इंग्रजांच्या काळात हे शहर जिल्हा मुख्यालय बनले. कालांतराने त्याचे बुलढाणा असे नामांतर करण्यात आले. परंतु बुलडाणा की बुलढाणा असा संभ्रम कायम होता. दरम्यान जिल्हा प्रशासनाने बुलडाणा नव्हे तर बुलढाणा असा उल्लेख करावा असे निर्देश दिले आहेत. गॅझेटमध्येही तसाच उल्लेख असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता नावाबाबतचा संभ्रम दूर झाला असून बुलडाणा हा उल्लेख योग्य नसून बुलढाणा हा उल्लेख योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. जन्मदाखले, आधार, टीसी यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रांवर जिल्ह्यांचं नाव लिहिताना नागरिकांची गफलत व्हायची. बुलढाणा की बुलडाणा या नावात अनेकांचा गोंधळ उडत होता. परंतु आता बुलढाणा या नावाचाच वापर जिल्हावासियांनी करावा, या नावाचा गॅझेटमध्येही उल्लेख असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.

Share This News
error: Content is protected !!