राज्याचा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाकडून मुंबईतील आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा परिसरात भाजपाकडून मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चानंतर माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.