Nashik

Ban On PoP Ganesh Idol : यंदा गणेशोत्सवासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी, नाशिक महापालिकेचा निर्णय

523 0

नाशिक : यंदा गणरायाचे आगमन उशिरा होणार आहे. तरीदेखील आतापासूनच सगळ्यांना गणरायाच्या आगमनाचे (Ban On PoP Ganesh Idol) वेध लागले आहे. त्यामुळे आतापासून मनपा प्रशासन तयारीला लागले आहे.यंदा गणेशोत्सवासाठी मूर्ती विक्री करणाऱ्यांना स्टॉल लावण्यासाठी परवानगी देताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्री करणार नसल्याचे हमीपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.

यंदा अधिक मासासह श्रावणाचा महिना असल्याने गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात होत आहे. मात्र गणपती उत्सव नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात नाशिक महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये उच्च न्यायालयाने नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी पीओपीच्या मूर्तीवर विक्री आणि साठा करण्यास बंदी घातलेली असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कृत्रिम तलाव उभारले जाणार
गणेश विसर्जनासाठी नेहमीप्रमाणे शहरातील विविध भागात कृत्रिम तलाव उभारले जातील. गोदावरी नदी आणि इतर चार उपनद्यांमध्ये प्रदूषण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असून, त्यादृष्टीने शहरासह उपनगरांमध्ये कृत्रिम तलाव उभारले जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide