पंढरपूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने (Ashadhi Ekadashi 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब विठ्ठलाची शासकीय महापूजा केली (Ashadhi Ekadashi 2023) यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी लता शिंदे मुलगा खासदार श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी आणि नातू रुद्र उपस्थित होते.
आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील प्रति पंढरपुरात जमला वैष्णवांचा मेळा !
यावेळी महाराष्ट्रात भरभरून पाऊस होऊ दे आणि बळीराजा समृद्ध होऊ दे अशा अशाच असं साकडं एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला (Ashadhi Ekadashi 2023) घातलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शेतकरी कुटुंबातील अहमदनगरमधील भाऊसाहेब आणि मंगळ काळे या दाम्पत्याला दुसऱ्यांदा पूजेचा मान शासकीय महापूजेचा मान मिळाला.मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनादेखील दुसऱ्यांदा हा मान मिळाला आहे.
आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी विठ्ठल मंदिरात 15 प्रकारच्या तब्बल 6 टन फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलं खास करुन थायलंडमधून मागवली आहेत. 30 विविध प्रकारच्या फुलांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, अब्दुल सत्तार अशी मंत्र्यांची फौज पंढरपुरात आहे.