Lahuji Shakti Sena

Lahuji Shakti Sena : लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेश अध्यक्षपदी मा. कैलास खंदारे यांची नियुक्ती

1331 0

पुणे : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य ‘राज्यस्तरिय विशेष बैठकीचे’ आयोजन लहुजी शक्ति सेना (Lahuji Shakti Sena) संस्थापक अध्यक्ष मा. विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील राजवाडा रिसॉर्ट येथे केले होते. राज्यभरातून विविध जिल्ह्यातून, जिल्हा पदाधिकारी व राज्य – विभाग पदाधिकारी सदरील बैठकीला (Lahuji Shakti Sena) उपस्थित होते. सदर बैठकीसमोरील विषय : संघटनात्मक कामाचा आढावा घेणे, महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीच्या सद्यस्थिती संदर्भात चर्चा करणे, विविध पदावरिल कार्यकर्त्यांची बढती करणे तसेच, पदांमध्ये फेरबदल करणे आणि नवनियुक्ति करणेबाबत, पदानिहाय जबाबदारी निश्चित करून संघटनेद्वारा करावयाचे नियोजित कार्यक्रम, उपक्रम तसेच सामाजिक न्यायिक आंदोलनाचे स्वरूप बनऊन कृतीशील अंमलबजावणीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यात आले.

Viral Video : देव तारी त्याला कोण मारी ! एकापाठोपाठ 3 भरधाव गाड्या अंगावरून गेल्या तरी वाचला चिमुकलीचा जीव

राज्य कार्यकरणीने एकमुखाने लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी एकमेव नाव समोर केले ते म्हणजे कैलासदादा खंदारे (Lahuji Shakti Sena) या पदाला न्याय देण्यासाठी यांनाच प्रदेशाध्यक्ष पद द्यावे. असा प्रस्ताव लहुजी शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष यांच्याकडे दिला. सर्वांच्या मत लक्षात घेता राज्य – विभाग व जिल्हा पदाधिकाऱ्यांसामोर राज्य प्रभारी प्रदेशाध्यक्ष मा. कैलासदादा खंदारे यांना नियुक्त करण्यात आले. सदरील निर्णयाचे सर्व राज्यभरतून राज्य – विभाग, जिल्ह्यातून उल्हासाचे, सकारात्मकतेचे वातावरण राज्यभर तयार झाले.

सदर बैठकीमध्ये संस्थापक अध्यक्ष लहुश्री विष्णुभाऊ कसबे, प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे, मा. प्रा. दिलीप अर्जुने, राज्य संघटक संतोष अहिरे, युवक अध्यक्ष सचिन क्षीरसागर, वि. आ. प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. हेमंतकुमार खंदारे, शिवाजीभाऊ गायकवाड, पश्चिम महा.अध्यक्ष महादेव भोसले, विदर्भ अध्यक्ष रुपेश खडसे, बालाजी गायकवाड, कैलासभाऊ थोरात,सागर लोखंडे, रोहित खलसे, वामनराव भिसे, संजयबापू कदम, डॉ. माणिक कांबळे, मुंबई सचिव बाळूभाऊ जाधव, कोंगे सर, आबासाहेब साळवे, एल. डी. कदम, दत्ताभाऊ जगताप,नागोराव अंबाटवार, रविकांत पवळे, पंकज जाधव आणि इत्यादी राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

सदरील बैठकीला सर्व राज्य विभाग पदाधिकार्यांचे मनोगत व्यक्त केले आणि लहुजी शक्ती सेनेच्या तसेच समाजाच्या अत्यंत आवश्यक मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेण्यासाठी भाग पडायचे असा संकल्प करून कार्यक्रमाची संगता झाली. सदर बैठकीचे सूत्रसंचालन विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत अरुण खंदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्य कार्यकरणी सदस्य शिवाजीभाऊ गायकवाड यांनी केले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!