ST Bus Video

ST Video : एसटी चालकाच्या एका हातात स्टेरिंग तर दुसऱ्या हातात… धक्कादायक व्हिडिओ आला समोर

596 0

गडचिरोली : गडचिरोलीतील अहेरी बस आगाराच्या छप्पर फाटलेल्या ST बसचा (ST Video) काही दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ ताजा असताना आता याच आगाराच्या आणखी एका बसचा (ST Video) व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर पावसात बसचा वायफर बंद झाल्याने एका हाताने स्टेरिंग आणि एका हाताने वायफर फिरवण्याची वेळ बसचालकावर आली आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे अहेरी आगारातील भंगार बस गाड्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी बस प्रवाशांना घेऊन आसरअल्लीवरून अहेरीकडे निघाली होती.

मात्र या दरम्यान वाटेतच पाऊस आल्याने बसच्या वायफरमध्ये बिघाड झाला. वायफर काम करत नसल्याने एसटीच्या समोरच्या काचेवर पाणी साचण्यास सुरुवात झाली. गाडी चालवण्यात अडथळा निर्माण झाला. अखेर या बसचालकाला तारेवरची कसरत करत एका हातात बसचं स्टेअरिंग तर दुसऱ्या हातानं वायफर फिरवत बस चालवावी लागली. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!