Sad News

Sad News : ट्रॅकवरून पायी जाताना महिलेच्या हातून 4 महिन्याचं बाळ पाण्यात पडलं; ठाकुर्ली स्थानकाजवळील घटना

4647 0

मुंबई : आज मुंबईमधील ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ एक मन हेलावून टाकणारी घटना (Sad News) घडली आहे. यामध्ये अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असताना एका महिला लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात होती. यादरम्यान (Sad News) एका महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातात असलेलं चार महिन्यांचं बाळ पाण्यात पडल्यानंतर वाहून गेलं. यावेळी या महिलेने काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला.

Hardeek-Akshaya : रील लाईफ हिरोवर भारी पडला रिअल लाईफ हिरो; राणादा अन् पाठकबाई देखील झाल्या थक्क

काय घडले नेमके?
आज दुपारी तीनच्या सुमारास अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान २ तास उभा होती. यावेळी काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. यादरम्यान एका लहान बाळाला घेऊन त्या बाळाची आई आणि एक व्यक्ती निघाले होते. तेव्हा त्यांच्या हातून चार महिन्यांचे बाळ सुटले आणि पाण्यात पडले. पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत ते बाळ वाहून गेले.

यानंतर त्या बाळाच्या आईने एक आक्रोश (Sad News) केला. तिचा हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तिचा आक्रोश ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!