Ajit Pawar

Ajit Pawar : अर्थमंत्रालयाचा पदभार मिळताच अजित पवारांनी सांगितला पुढचा प्लॅन

724 0

नाशिक : अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. अर्थमंत्रालय मिळाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अर्थमंत्री म्हणून पुढचा प्लॅन देखील सांगितला आहे.

Gattari Utsav : गटारीनिमित्त भाजपकडून कोंबडी वाटप; ‘या’ ठिकाणी मिळणार मोफत कोंबडी

काय म्हणाले अजित पवार?
राज्याच्या विकासासाठी आम्ही युतीसोबत येण्याचा निर्णय घेतला. अर्थमंत्रालयाचा पदभार स्विकारल्यानंतर मी सर्वप्रथम पाऊस आणि अर्थखात्याचा आढावा घेतला. अद्याप राज्यात पाहिजे तसा पुरेसा पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढवले आहे. त्यामुळे लोकांना काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे. वातावरण बदलाचा पावसावर परिणाम होत आहे. सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. प्रशासनाचा अनुभव असल्यामुळे जनतेसाठी चांगलं काम करेल असे अजित पवार म्हणाले आहेत.

Suicide News : आदर्श पतसंस्थेतील 22 लाख बुडाल्याच्या भीतीने शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

तसेच सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. केंद्राचंही या प्रश्नावर लक्ष वेधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे. पुणे – नाशिक रेल्वे मार्गावर देखील तोडगा काढणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!