AJIT PAWAR

राष्ट्रवादीच्या फक्त त्याच लोकांना विधानसभेचे तिकीट मिळणार; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

721 0

मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा सोमवारी वाढदिवस आहे, या निमित्ताने नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरमध्ये कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे. या सगळ्यावर आता राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमके काय म्हणाले अजित पवार?
यादरम्यान अजित पवार यांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. वरिष्ट नेत्यांनी लोकसभेत जावं असा काही निर्णय झालेला नाही. आम्ही सध्या अंदाज घेत आहोत. सध्या आमचं लोकसभा निवडणुकीकडं लक्ष आहे. जो लोकसभा निवडणुकीत चांगलं काम करेल अशाच लोकांचा विधानसभेच्या तिकीटासाठी विचार होईल असं अजित पवार यावेळी म्हणाले.

भावी मुख्यमंत्र्यावर प्रतिक्रिया
नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लागले म्हणून कोणाला त्रास व्हायचं काही काम नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो म्हणून ते पोस्टर लावतात. मात्र मुख्यमंत्री असंच होता येत नाही. त्यासाठी पक्षाकडे 145 चा आकडा लागतो. ज्या पक्षाकडे हा आकडा आहे, त्यांचा मुख्यमंत्री होतो असे अजित पवार म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!