मुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर राज्याला जणू राजकीय भूकंपाची सवयच झाली आहे. मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंड करत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. एकनाथ शिंदेच्या पावलावर पाऊल ठेवत रविवारी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर दावा केलाय…
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये अजित पवार यांनी सर्वाधिक 4 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्याच्या राजकारणाला राज्यशास्त्राचे धडे देणारे अजित पवार त्यांचे शिक्षण किती आहे जाणून घेऊया…
Dhule Accident: रस्त्यातील वाहनांना उडवून हॉटेलमधील लोकांना चिरडलं; धुळे अपघाताचे CCTV आले समोर
अजित पवार (Ajit Pawar) यांचे पूर्ण नाव अजित अनंतराव पवार हे आहे.अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्यांनी राजकारणाचे धडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहेत. अजित पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे 22 जुलै 1959 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक आणि दहावी पर्यंतचे शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाले. पुढे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जावे लागले. पण वडिलांचे अकस्मित निधन झाल्याने त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागले.
Road Accident : धक्कादायक! ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
वडिलांच्या निधनानंतर ते अर्धवट शिक्षण सोडून बारामतीला परत आले. बारामतीत आल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांमधून सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली .त्यानंतर ते सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर निवडून आले. त्यानंतर त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही मागे वळून पहिले नाही. myneta.info वरील प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार हे फक्त दहावी पास राजकारणी आहेत. पण त्यांनी आजवर अनेकांना राजकारणाचे धडे दिले आहेत.