LC

Maratha Reservation : एक कुणबी तर दुसरा मराठा सख्ख्या बहीण-भावाच्या दाखल्यांवर जातीची वेगवेगळी नोंद

2298 0

अहमदनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढताना दिसत आहेत. यासाठी त्यांनी आमरण उपोषणदेखील सुरु केले. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये शांततेत चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे आपण पहिलेच आहे. अखेर सरकार मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले. मनोज जरांगे यांनी सरकारला 2 महिन्यांची वेळ वाढवून देत आपले उपोषण मागे घेतले आहे.

यादरम्यान आता अहमदनगरमधून एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. यामध्ये जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी एकाच घरात भाऊ व बहीण यांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी आढळून आली आहे. यात बहिणीची कुणबी तर भावाची मराठा नोंद आहे. यामुळे मराठा म्हणजे कुणबी असल्याचाच हा पुरावा आहे. शासनाने मराठा समाजाला कुणबी आरक्षण ताबडतोब द्यावे अशी मागणी होत आहे. जामखेड तालुक्यात मोरे कुटुंबात बहीण कुणबी तर भाऊ मराठा अशी नोंद शाळेच्या दाखवल्यांवर आहे. चंद्रभागा भाऊ मोरे – हिंदू कुणबी आणि दिगंबर भाऊ मोरे – हिंदू मराठा, अशी शाळेच्या दाखवल्यांवर नोंद आहे. यामुळे मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

सख्खे भाऊ बहीण असूनही दाखल्यांवर वेगवेगळी नोंद आहे. अजूनही अनेक जणांची अशीच नोंद मिळत आहे. राज्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. काहींच्या नोंदी कुणबी तर नंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहेत. मात्र, जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी एकाच घरात वेगवेगळ्या नोंदी आहेत. पुण्यातदेखील अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन भावांच्या दाखल्यांवर एकाची कुणबी तर एकाची मराठा अशी नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Share This News
error: Content is protected !!