Solapur News

Solapur News : धनगर आरक्षणावरून कार्यकर्ते आक्रमक ! विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला

425 0

सोलापूर : सोलापुरमधून (Solapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये धनगर आरक्षणाचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यानं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. सोलापुरातल्या शासकीय विश्रामगृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे शासकीय विश्रामगृहात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, याचा निषेध करण्यासाठी विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला. विखे पाटील यांना निवेदन देतानाच या कार्यकर्त्याने त्यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच दुसरीकडे आता धनगर आरक्षणासाठी देखील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात विखे पाटील यांना निवेदन देताना कार्यकर्त्याने त्यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे.

Share This News
error: Content is protected !!