ब्रेकिंग न्यूज ! भाटघर धरणात एकाच कुटुंबातील 5 महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

458 0

 

भोर तालुक्यातील नऱ्हे गावाजवळील भाटघर जलाशयात दुपारी १२ वाजता पोहण्यासाठी गेलेल्या पाच विवाहित महिला बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भोर तालुक्यातील नऱ्हे येथील हरीभाऊ रामचंद्र चव्हाण यांच्या चार विवाहित मुली दोन दिवसापुर्वीच पुजेसाठी आल्या होत्या. गुरुवारी सकाळी १२ वाजेच्या दरम्यान या चौघी व चव्हाण यांच्या सून मोनिका रोहित चव्हाण या भाटघर जलाशयात पोहण्यासाठी गेल्या होत्या.सायंकाळी पाच वाजले तरी त्या घरी परत न आल्याने नातेवाईकानी जलाशय परिसरात शोध घेतला असता ही घटना निर्दशनास आली.त्यातील चार महिलांचे मृतदेह सापडले आहेत. बुडालेल्यांमध्ये चार सख्ख्या बहिणी व त्यांच्या वहिनीचा समावेश आहे. त्यातील तीन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या वहिनीचा मृतदेह सापडले आहेत. खुशबू लंकेश रजपूत (वय १९, रा. बावधन, पुणे), मनिषा लखन रजपूत (वय २०), चांदणी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघी रा. संतोषनगर हडपसर, पुणे) आणि मोनिका रोहित चव्हाण (वय २३, रा. नऱ्हे, ता. भोर) अशी या पाच जणींची नावे आहेत. यातील मनिषा रजपूत यांचा मृतदेह अद्यापही हाती न लागल्याने शोधकार्य सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!