Breaking News
Buldhana Accsident

धक्कादायक ! नवसासाठी जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; 20 जण जखमी

1436 0

बुलढाणा : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराईतील सैलानी बाबा (Sailani Baba) या ठिकाणी नवसासाठी जाणारे मॅटोडोअर वाहन ढासाळवाडी जवळील एका वळणावर पलटी झाले. या अपघातात (Accident) त्यातील 20 ते 25 भाविक गंभीर जखमी झाले. हे सगळे जखमी भाविक जालना (Jalna) जिल्ह्यातील काठोडा बाजार येथील आहेत. हे सगळे आज एका मॅटोडोअरने नवसासाठी सैलानी या ठिकाणी जात होते.

या अपघातात जखमी झालेल्यांना ढसाळवाडी येथील नागरिक तसेच पोलिसांनी बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.जखमींमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि बालकांचा समावेश आहे. बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हाजी हजरत अब्दुल रहेमान (Haji Hazrat Abdul Rahman) सैलानी बाबांचा दर्गा आहे. या दर्ग्याची ख्याती दुरपर्यंत आहे.

यामुळे नेहमीच संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी तसेच नवस करण्यासाठी येत असतात. आज जालना जिल्ह्यातील काठोरा येथील 20 भाविक खाजगी वाहनाने या दर्ग्यात दर्शनासाठी चालले होते. मात्र, दर्शनाच्या ठिकाणी पोहचण्याआधीच हा अपघात झाला. ढासाळवाडीजवळ एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share This News
error: Content is protected !!