Tata Group

Tata Group : मॅगीला टक्कर देण्यासाठी टाटा ‘या’ कंपनीची करणार खरेदी

453 0

मुंबई : सध्या टाटा ग्रुप (Tata Group) तुमच्या ताटात मीठापासून मसाल्यापर्यंत, चहापासून कॉफीपर्यंत सर्व काही देत आहे. तृणधान्यापासून, कडधान्य या संपूर्ण श्रेणी टाटाच्या ‘फूड फॅमिली’चा भाग आहेत. आता यामध्ये चायनीज फूडची भर पडणार आहे. ‘मॅगी नूडल्स’ ला टक्कर देण्यासाठी टाटा दोन कंपन्यांची खरेदी करणार आहे.

कोणत्या आहेत ‘त्या’ दोन कंपन्या?
टाटा समूह दोन फूड कंपन्यांच्या अधिग्रहणासाठी करार करण्याच्या जवळ आला आहे. यातील एक कंपनी कॅपिटल फूड्स (Companies Capital Foods) आणि दुसरी ऑरगॅनिक इंडिया (Organic India) आहे. कॅपिटल फूड्स हे ‘चिंग्स चायनीज’ आणि ‘स्मिथ अँड जोन्स’ सारख्या ब्रँडचे मालक आहे. तर ऑरगॅनिक इंडिया ही कंपनी ग्रीन टी सारखी इतर उत्पादने विकते. फॅब इंडियाने यामध्ये गुंतवणूक केली आहे.

टाटा समूहाची कंपनी ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ आपल्या गुंतवणूकदारांकडून कॅपिटल फूड्समधील 75 टक्के हिस्सा खरेदी करत आहे. कॅपिटल फूड्सचे संस्थापक चेअरमन अजय गुप्ता त्यात त्यांचा 25 टक्के हिस्सा कायम ठेवतील. कंपनीचे मूल्यांकन 5100 कोटी रुपये आहे, त्यामुळे हा करार 3,825 कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणं टाटा समूह ऑरगॅनिक इंडियामधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करणार आहे. या करारासाठी ऑरगॅनिक इंडियाचे मूल्य 1800 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. टाटा समूह पुढील आठवड्यात या दोन्ही करारांबाबत अधिकृत घोषणा करू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याप्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Sanjay Kakade : माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ! भोसले सहकारी बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यासह 18 जणांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Police : पुणे पोलिसांची विशेष मोहीम ! रात्रभर गन्हेगारांची धरपकड; तब्बल ‘इतक्या’ गुन्हेगारांना केली अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!