Home Loan

SIP with Home Loan : घरासाठी कर्ज काढताय? आता SIP द्वारे मिळणार होम लोन

508 0

कर्ज घेऊन घर खरेदी करणे खूप महागडे ठरत आहे. प्रचंड कर्जामुळे लोक आर्थिक बोझ्याखाली दबले जातात. होमलोनद्वारे (SIP with Home Loan) घेतलेल्या घराची किंमत जवळपास दुप्पट होते. हे करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे SIP. म्हणजेच एसआयपीद्वारे तुम्ही सहज होमलोन मिळवू शकता. आता ते कसे जाणून घेऊया…

SIP मध्ये गुंतवणूक करून असा करा फायदा
जर तुम्ही 50 लाख रुपयांचे घर घेतले. तुम्ही 80 टक्के म्हणजेच 40 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास, व्याज भरण्यासाठी मोठी रक्कम खर्च होईल. अशा स्थितीत हे व्याज फेडण्याचा विचार करायला हवा. यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा एक चांगला पर्याय आाहे. तुम्हाला होमलोनच्या EMI वरून SIP मध्ये किती पैसे भरावे लागतील हे ठरवता येईल.

SIP द्वारे होमलोन मॅनेज करा
SIP द्वारे तुम्ही होमलोनचे व्याज सहज मिळवू शकता. जर तुम्ही 10 वर्षांच्या कालावधीसाठी 12-15 टक्के व्याजदराने दर महिन्याला रु 5000 ची गुंतवणूक सुरू करू शकता. शेवटी तुम्ही 14 लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळवू शकता. हे पैसे तुम्ही होमलोनची परतफेड करण्यासाठी वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही एसआयपी रिटर्नचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकता. यामुळे घराचे कर्ज फेडायला मदत होईल.

Share This News
error: Content is protected !!