भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI Guidelines) बँका आणि वित्तीय संस्थांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व (RBI Guidelines) जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत लोन अकाउंट्समधील पेनल्टीबाबत अनेक नियमांबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात….
रिझर्व्ह बँकेकडून नियम जारी
रिझर्व्ह बँकेनं एक परिपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी नवीन नियमांबाबत जाहीर केले आहे. या गाईडलाईन्सनुसार लोन अकाउंट्सवर पेनल्टीच्या नियमांचं कसं पालन करु शकतात, या सूचना परिपत्रकात सांगण्यात आल्या आहेत. बँका कर्जावर आकारल्या जाणार्या व्याजात दंडाची भर घालत आहेत आणि त्या आधारावर कर्जदारांकडून व्याजावर व्याज आकारत आहेत, अशा अनेक अलिकडच्या घडामोडींनंतर RBI नं हा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार, कर्जाचे हफ्ते चुकल्यास, बँकांकडून आकारला जाणारा दंड हा दंडात्मक व्याज म्हणून नव्हे तर दंडात्मक शुल्क म्हणून गणला जाईल. या सगळ्या नवीन नियमांची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. ट्वीटमध्ये RBI नं परिपत्रक शेअर केलं आहे. परिपत्रकामध्ये बदललेल्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कधीपासून लागू होणार या गाईडलाईन्स ?
आरबीआयच्या परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, जारी करण्यात आलेल्या नव्या गाईडलाईन्स पुढील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहेत. स्मॉल फायनान्सेस बँक, लोकल एरिया बँक आणि रिजनल रुरल बँकांना नवा नियम लागू असेल, तसेच, पेमेंट बँकांनाही हा नियम लागू होणार आहे. याबरोबर सर्व प्रायमरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, एनबीएफसी आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या अखिल भारतीय वित्तीय संस्था जसं, एक्जिम बँका, NABARD, NHB, SIDBI आणि NaBFID सारख्या वित्तीय संस्था देखील RBI च्या या मार्गदर्शक तत्त्वांच्या कक्षेमध्ये येणार आहेत.