RBI

Personal Loan : पर्सनल लोनबाबत RBI ने नियमांमध्ये केला बदल

296 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वसामान्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण तुमचं वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आता महागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वैयक्तिक कर्ज वितरणाच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे. जर कोणतीही बँक किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी वैयक्तिक कर्ज देत असेल. तर त्यासाठीची बफर राखीव रक्कम 25 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँक आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीसाठी हा नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी असुरक्षित मानल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाशी संबंधित नियम आणखी कडक केले आहेत. राखीव रक्कम 25 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे असुरक्षित कर्ज बुडण्याची भीती लक्षात घेता बँकांना आता पूर्वीपेक्षा 25 टक्के अधिक तरतूद करावी लागणार आहे. आत्तापर्यंत बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी ग्राहक कर्जाचे बफर राखीव रक्कम 100 टक्के होती. ती आता 125 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. हा नियम गृहकर्ज, शिक्षण कर्ज, गाडी घेण्यासाठीचं कर्ज आणि सोने तारण ठेवून घेतलेल्या कर्जावर लागू होणार नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!