Mukesh Ambani And Gautam Adani

Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या नव्या कंपनीने शेअर बाजारात एंट्री घेताच अदानींच्या ‘या’ कंपनीला टाकले मागे

356 0

गुरुवारी भारतीय अब्जाधीश आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजपासून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी वेगळी झाली. या नवीन कंपनीच्या शेअरची किंमत 261.85 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनी सुमारे 20 अब्ज डॉलर्सची कंपनी म्हणून उदयास आली आहे. ही अंदाजे किंमत मूल्यांकनाच्या बाबतीत कोल इंडिया, इंडियन ऑइल सारख्या सर्व मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे.

भारतातील टॉप-40 कंपन्यांमध्ये समाविष्ट
मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) या वित्तीय सेवा कंपनीचे डिमर्जर शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, गुरुवार, 20 जुलै रोजी झाले. त्याच्या शेअरची किंमत निश्चित करण्यासाठी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने एक तासाचे विशेष प्री-ओपन सत्र आयोजित केले होते. यामध्ये या कंपनीची स्टॉकची किंमत 261.85 रुपये इतकी निश्चित करण्यात आली. ती देशातील एक किंवा दोन नव्हे तर बाजार भांडवलाच्या बाबतीत टॉप-40 भारतीय कंपन्यांपैकी एक बनली आहे.

रिलायन्स पहिल्या क्रमांकावर
जर आपण देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांबद्दल बोललो तर मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 17 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अंबानींची नवीन कंपनी जिओ फायनान्शिअल अंदाजे 20 अब्ज डॉलर बाजार मूल्यासह देशातील 32 वी सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून उदयास आली आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत या कंपनीने गौतम अदानी यांच्या अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, कोल इंडिया, इंडियन ऑइल आणि बजाज ऑटो या कंपन्यांना मागे टाकले आहे.

Share This News
error: Content is protected !!