सोने खरे कि खोटे कसे ओळखावे ? गोल्ड व्हॅल्युअर्स करीता शनीवारी पुण्यात कार्यशाळा , वाचा सविस्तर

465 0

पुणे : गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनतर्फे पुणे जिल्ह्यातील गोल्ड व्हॅल्युअर्स करीता शनिवारी पुण्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २४ सप्टेंबर २०२२ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुर्वांकुर बँक्वेट हॉल, टिळक रस्ता येथे ही कार्यशाळा होणार आहे. गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनचे पुणे जिल्हाध्यक्ष दामोदर खरोटे, पुणे शहर प्रमुख सत्यनारायण वर्मा, प्रशासकीय सचिव सतीश पितळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

कार्यशाळेत असोसिएशनचे तज्ञ कोअर कमिटी मेंबर्स व्हॅल्युअर्स बांधवांना व्हॅल्युएशन संबंधी सखोल मार्गदर्शन करतील. तसेच बनावट सोन्याचे दागिने ओळखण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येईल. सराफ असोसिएशन पुणेचे अध्यक्ष फतेचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे,कार्याध्यक्ष राजेन्द्र डिंडोरकर,सचिव.राजाभाऊ वाईकर, उपाध्यक्ष नचिकेत भुर्के ,उपाध्यक्ष चेतन राजापूरकर ,खजिनदार दीपक देवरुखकर हे मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.अशा प्रकारच्या कार्यशाळा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत घेण्याचे असोसिएशनचे नियोजन आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide