Pan Card

Pan Card : पॅनकार्ड हरवलंय? नो टेन्शन आता घरबसल्या डाउनलोड होईल E – PAN

366 0

आजच्या काळात कोणत्याही आर्थिक कामासाठी पॅन कार्ड (Pan Card) हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. नागरिकांकडे Pan Card असणे अत्यंत महत्त्वाचे असून हे कार्ड आयकर विभागाकडून जारी केले जाते. पॅन कार्डचा वापर केवळ ओळपत्र म्हणून केला जात नाही, तर आयकर रिटर्न भरताना हे कार्ड खूप महत्वाचे असते.

पॅन कार्डचा कुठे – कुठे होतो वापर?
तुमच्या पॅनकार्डच्या मदतीने आयकर विभाग तुमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती ठेवतो. पॅन कार्डच्या मदतीने मोठी रक्कम जमा आणि काढता येते. बँकेत खाते उघडण्यासाठीही त्याचा वापर केला जातो, तो खात्याशीही जोडला जातो. यामुळे ते खूप महत्वाचे मानले जाते. यादरम्यान तुमच्याकडून हे कार्ड हरवले तर तुमचे खूप कामे रखडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आयकर विभागाची ई -पॅन सेवा खूप उपयुक्त आहे.

जर हे कार्ड हरवले तर आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण तुम्ही आयकर, UTIITSL किंवा NSDL वेबसाइटवरून तुमचे ई -पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता. ई -पॅन कार्ड ही पॅन कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी आहे. चला तर मग आता ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे हे जाणून घेऊया…

जर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक केला असेल, तर आयकर ई-फायलिंग वेबसाइट हे पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी योग्य ठिकाण आहे.

स्टेप 1: सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट देण्याची आवश्यकता आहे.

स्टेप 2: नंतर डाव्या बाजूला Instant E-PAN चा पर्याय निवडा.

स्टेप 3: आता खाली Continue वर क्लिक करा Check Status/ Download PAN डाउनलोड करा.

स्टेप 4: आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. नंतर खाली दिलेल्या चेकबॉक्सवर खूण करा आणि नंतर Continue वर क्लिक करा.

स्टेप 5: आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल (Mobile) नंबरवर एक OTP पाठवला जाईल.

स्टेप 6: आता OTP टाका आणि Continue वर क्लिक करा.

स्टेप 7: यानंतर, दुसरी स्क्रीन दिसेल ज्यामध्ये View E-PAN आणि Download E-PAN करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. यामधून Download E-PAN चा पर्याय निवडा.

स्टेप 8: नंतर Save the PDF file वर क्लिक करा. यानंतर तुमचा ई-पॅन डाउनलोड होईल.

तुम्ही डाउनलोड केलेली PDF फाइल पासवर्ड संरक्षित असेल, तर त्याचा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल जी DDMMYYYY फॉरमॅटमध्ये असेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!