GOLD RATE TODAY : सध्या सणासुदीचे दिवस पाहता सोनं आणि चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. अशातच सोन्याच्या दरामध्ये दोन दिवसांपासून घसरण होते आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र वाढ नोंदवली जाते आहे .
आजच्या सोन्याचा दर 51437 रुपये प्रति तोळा आहे . शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 51668 रुपये प्रति तोळावर बंद झाला होता. आज सोन्याच्या दरामध्ये 231 रुपये घसरण नोंदवण्यात आली आहे .
चांदीचा दर 57,622 रुपये प्रति किलो वर नोंदवण्यात आला आहे . आज 757 रुपये प्रति किलो दरवाढ चांदीमध्ये नोंदवण्यात आली आहे.