दिवाळीचा सण आला असून, संपूर्ण देशभरात यानिमित्ताने उत्साह आहे. बाजारांमध्ये खरेदीसाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. घराची सजावट, फराळ यामध्ये सगळे व्यग्र असल्याने इतर कामं बाजूला ठेवण्यात आली आहेत. मात्र दिवाळीमध्ये तुम्हाला कोणते व्यवहार करायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण बँका (Bank Holiday) सलग 6 दिवस बंद असणार आहेत. म्हणजेच तुमच्या बँकेच्या शाखेत कोणतीही कामं होणार नाहीत. रिझर्व्ह बँकेने महिन्याच्या सुरुवातीला आपल्या वेबसाईटवर Banking Holiday ची यादी जाहीर केली होती. ही यादी प्रत्येक राज्यातील सणांवर आधारित असते. नोव्हेंबर महिन्यातील बँक हॉलिडेच्या यादीनुसार, 10 ते 15 नोव्हेंबरपर्यंत बँकांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या बँक हॉलिडे यादीनुसार, नोव्हेंबर महिन्यात एकूण 15 बँक हॉलिडे आहेत. यामधील काही सुट्ट्या संपल्या आहेत. दरम्यान, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा हे सण आगामी दिवसांत येणार आहेत. ज्याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होणार आहे. या 6 सुट्ट्यांमध्ये शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. बँकेने जाहीर केलेल्या सुट्ट्यांची यादी तुम्ही आरबीआयच्या बेवसाईटवरही पाहू शकता.
बँका बंद असल्याने काही ठिकाणी एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडाही जाणवू शकतो. सलग 6 दिवस बँक बंद असल्या तरी तुम्ही ऑनलाइन बँकेची कामं करु शकता. ऑनलाइन सुविधा 24 तास उपलब्ध असल्याने तुम्ही आर्थिक व्यवहार करु शकता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.