Debit Card

Debit Card : 31 ऑक्टोबरनंतर ‘या’ सरकारी बँकेचे Debit Card होणार बंद; ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे

1492 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या काळात डेबिट कार्डचा (Debit Card) वापर जवळपास प्रत्येकजण करत असतो. आता 31 ऑक्टोबरला एका सरकारी बँकेचं डेबिट कार्ड हे बंद होणार आहे. सरकारी बँक BoI मध्ये अकाउंट असणाऱ्या ग्राहकांचं डेबिट कार्ड पूर्णपणे निरुपयोगी होणार आहे. बँक ऑफ इंडियाने याविषयी ट्विट करून याची माहिती दिली आहे. 31 ऑक्टोबरनंतर ग्राहक त्यांच्या एटीएम कार्डमधून कोणताही व्यवहार करू शकणार नाहीत किंवा पैसे काढू शकणार नाहीत.

बँक ऑफ इंडियाने काय लिहिले ट्विटमध्ये?
बँक ऑफ इंडिया (BOI) ने ट्विटमध्ये लिहिले आहे की प्रिय ग्राहक, रेग्युलेटरी गायडलाइन्सनुसार डेबिट कार्ड सेवांचा लाभ घेण्यासाठी व्हॅलिड मोबाइल नंबर अनिवार्य आहे. बँकेने ग्राहकांना विनंती केली आहे की, त्यांनी कृपया त्यांच्या शाखेला भेट द्यावी आणि डेबिट कार्ड सेवा बंद होऊ नये म्हणून 31.10.2023 पूर्वी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट/रजिस्टर करावा.

तुम्ही देखील बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर लगेच जा आणि बँकेशी संपर्क साधा. याशिवाय, तुम्हाला भविष्यातही बँकेचे डेबिट कार्ड वापरायचे असेल, तर उशीर न करता शाखेत जाऊन तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर करुन घ्या. अन्यथा, तुम्ही कार्डद्वारे पैसे काढू शकणार नाही किंवा इतर कोणताही ट्रांझेक्शन करू शकणार नाही.

Share This News
error: Content is protected !!