Bank Holiday

Bank Holiday : ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका; RBI कडून यादी जाहीर

1153 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सप्टेंबर महिना संपत आला असून काही दिवसांनी ऑक्टोबर महिना (Bank Holiday) सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात अनेक विविध सण येणार आहेत. त्यामुळे तुमची अनेक कामे रखडण्याची शक्यता आहे. या महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्टी असणार आहे. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास ते त्वरित पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ऑक्टोबर महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत.

‘या’ तारखांना बँका बंद राहतील
2 ऑक्टोबर (सोमवार) – गांधी जयंती – राष्ट्रीय सुट्टी
14 ऑक्टोबर (शनिवार) – महालय- कोलकातामध्ये बँका बंद
18 ऑक्टोबर: (बुधवार) – काटी बिहू – आसाममध्ये बँका बंद.
21 ऑक्टोबर (शनिवार) – दुर्गा पूजा (महा सप्तमी) – त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि बंगालमध्ये बँका बंद.
23 ऑक्टोबर (सोमवार) – दसरा (महानवमी)/आयुधा पूजा/दुर्गा पूजा/विजय दशमी – त्रिपुरा, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, झारखंड, बिहारमध्ये बँका बंद आहेत.
24 ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा/दसरा (विजयादशमी)/दुर्गा पूजा – आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद.
25 ऑक्टोबर (बुधवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद.
26 ऑक्टोबर (गुरुवार) – दुर्गा पूजा (दसैन) सिक्कीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद.
27 ऑक्टोबर, (शुक्रवार) दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद आहेत.
28 ऑक्टोबर (शनिवार) – लक्ष्मी पूजा – बंगालमध्ये बँका बंद .
31 ऑक्टोबर (मंगळवार)- सरदार वल्लभ भाई पटेल जयंती

बँक बंद असताना कसा व्यवहार करणार?
ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. यादरम्यान तुम्हाला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र यादरम्यान तुम्ही UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या सेवा वापरू शकता. याद्वारे तुम्ही तुमचे महत्वाचे व्यवहार पूर्ण करू शकता.

Share This News
error: Content is protected !!