Aadhar

Aadhar Card : आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

481 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आधार कार्डबाबत (Aadhar Card) मोठा निर्णय घेतला आहे. आता ज्यांना आधार कार्डमध्ये मोफत बदल करायचे आहेत ते आता 14 मार्चपर्यंत करू शकता. UIDAI ने My Aadhaar पोर्टलद्वारे आधार तपशील मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. सामान्य लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, त्या आधारावर ही सुविधा आणखी 3 महिन्यांसाठी म्हणजेच 15 डिसेंबर ते 14 मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोफत सुविधा फक्त ऑनलाइन अपडेटसाठी उपलब्ध आहे. कागदपत्रे अपडेट करण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष आधार केंद्रांवर गेल्यास तुम्हाला 25 रुपये शुल्क भरावे लागेल.

आधार अपडेटसाठी myAadhaar वेबसाइट कशी वापरायची?
सर्व प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा.
तुमचा आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी वापरून लॉगिन करा आणि नंतर ‘अपडेट नाव/लिंग/डीओबी आणि पत्ता’ बटण निवडा आणि क्लिक करा.
आता ‘अपडेट आधार ऑनलाइन’ बटणावर क्लिक करा.
पर्याय सूचीमधून ‘पत्ता’ किंवा नाव किंवा लिंग निवडा आणि नंतर ‘आधार अपडेट करण्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करा.
आता अ‍ॅड्रेस अपडेटच्या बाबतीत, एखाद्या व्यक्तीला अ‍ॅड्रेस प्रूफ सारख्या अपडेट केलेल्या पुराव्याची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
आता यामध्ये कोणतेही पेमेंट समाविष्ट नाही, परंतु 14 मार्च 2024 नंतर या अपडेटसाठी 25 रुपयांचे पेमेंट ऑनलाइन घेतले जाईल.
यानंतर एक नवीन वेबपेज उघडेल आणि त्यावर ‘सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN)’ असेल. भविष्यातील संदर्भासाठी ते तुमच्याकडे ठेवा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!