2000 Rupees Note

2000 Rupees Note : 2 हजारांची नोट आता ‘या’ ठिकाणी चालणार नाही

2243 0

तुमच्याकडे अजूनही 2000 च्या नोटा (2000 Rupees Note) असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 2 हजारच्या नोटेसंदर्भात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने काही दिवसांपुर्वी महत्वाचे निर्देश दिले होते. त्यानुसार अनेकांनी चलनातील 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या. पण काही लोक असेही आहेत त्यांनी नोटा बॅंकेत जमा करण्याऐवजी ई-कॉमर्स वेबसाइटवरून कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) ऑर्डर केल्यावर वापरल्या. 2000 रुपयांच्या नोटा चलनात बाद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यावेळी ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.

आता जर तुम्ही अमेझॉनवरून कॅश ऑन डिलिव्हरी (COD) ऑर्डरसाठी 2 हजारची नोट देण्याचा प्रयत्न केलात तर ती स्वीकारली जाणार नाही. 2 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर असल्याचे अमेझॉनकडून सांगण्यात आले आहे. म्हणजेच आता तुम्ही अमेझॉनवर कोणतीही वस्तू ऑर्डर केलीत तर आता अमेझॉन तुमच्याकडून 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाही. कंपनीकडून याची माहिती देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!