आता पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे लोकांना खास करून महिलांना एक चिंता सतावत असते ती म्हणजे आपला मेकअप (Monsoon Makeup Tips). पावसाळ्यात त्यांचा मेकअप (Monsoon Makeup Tips) बिघडण्याची खूप शक्यता असते. जर तुम्हाला तुमचा मेकअप टिकवून ठेवायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे. जर तुम्ही त्या ट्राय केल्या तर तुमचा मेकअप बिघडण्याची शक्यता कमी आहे. चला तर मग जाणून घेऊया या ट्रिक्स…
क्रीम बेस प्रॉडक्ट्स
जर तुम्ही क्रीम बेस असलेल्या उत्पादनांचा वापर करत असाल तर पावसाळ्याच्या दिवसांत त्यांचा वापर कमी करावा. या काळात जास्त ह्युमिडिटी असते, त्यामुळे क्रीम बेस असलेली उत्पादने नीट ब्लेंड करून मगच त्यांचा वापर करावा.
Headphones VS Earphones : हेडफोन की ईयरफोन काय आहे अधिक सुरक्षित ?
सेटिंग पावडरचा वापर करा
पावसाळ्यात आपला मेकअप जास्त टिकावा यासाठी सेटिंग पावडरचा वापर करा. एक चांगली सेटिंग पावडर वापरून तुमचा मेकअप सेट करा. यामुळे मेकअप जास्त काळ टिकून राहण्यास मदत होईल.
बोल्ड लिप कलर्स वापरावेत
लिपस्टीकबद्दल अनेक महिला एक्सपेरिमेंट्स करत असतात. मान्सून सीझनमध्ये बोल्ड लिप कलर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमचा मेकअपही खूप उठून दिसण्यास मदत होईल.
हायजीनचीही घ्या काळजी
पावसाळ्याच्या दिवसात जास्त हेवी मेकअप करणे टाळावे. तसेच तुमच्या त्वचेचीही या ऋतूमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे असते.या ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे आपल्याला जास्त घाम येतो. त्यामुळे त्वचेला संसर्ग होण्याचीही शक्यता जास्त असते.