Skin Care

Skin Care: तुमच्या कपाळाच्या काळेपणामुळे हैराण आहात? तर ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

567 0

आजकाल क्लीन आणि चमकदार त्वचा (Skin Care) प्रत्येकाला हवी असते. पण आजच्या काळात असे खूप कमी लोक असतात ज्यांना अशी त्वचा मिळते. आजकाल लोक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. कपाळावर काळपटपणा होणे ही फार कॉमन समस्या झाली आहे. काहींचा चेहरा स्वच्छ असतो परंतु त्यांच्या कपाळावर खूप टॅनिंग असते. टॅनिंगमुळे चेहरा आणि कपाळाचा रंग वेगळा दिसतो. त्यामुळे त्यांचा लूक खूप वेगळा दिसतो. जर तुम्हालादेखील ही समस्या असेल तर आज आपण यावरील उपाय जाणून घेणार आहोत…

बदामाचे तेल
बदामाच्या तेलात दूध आणि मध मिसळून पेस्ट बनवा. आता ते तुमच्या कपाळावर लावा. हे कोरडे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेच्या प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.

हळद गुणकारी
हळदी तर खूप गुणकारी असते. कपाळाचा काळेपणा दूर करण्यासाठी कच्च्या दुधात हळद मिसळा आणि आता ही पेस्ट कपाळाच्या पिगमेंटेड भागात लावा. यामुळे टॅनिंगची समस्या हळूहळू दूर होईल.

बटाट्याचा रस
बटाटा किसून घ्या आणि त्याचा रस काढा, आता प्रभावित भागावर लावा. बटाट्याचा रस लावल्याने कपाळावरील काळेपण हळूहळू दूर होते.

काकडी दूर करते
पोषक तत्वांनी युक्त काकडी पिगमेंटेशन सहज दूर करू शकते. काकडीचे तुकडे करून कपाळावर मसाज करा. 30 मिनिटे चेहरा असाच राहू द्या. आता पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Nanded Accident News : धक्कादायक ! जरांगेंच्या सभेच्या स्वयंसेवकांची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमविवाह करणे तरुणीला पडले महागात; लग्नाच्या 6 महिन्यानंतर तरुणीची आत्महत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!