सण समारंभ असो किंवा कोणतीही पार्टी प्रत्येक वेळी सलोन मध्ये जाऊन ब्युटी ट्रिटमेंट करून घेणे किंवा मेकअप करून घेणे हे शक्यच नसतं . गृहिणी , नोकरदार महिला यांना तर सलोनला नियमित जाणं देखील शक्य नसतं . मग अशावेळी काही सिम्पल टिप्स फॉलो करून देखील तुमची त्वचा स्वच्छ आणि नितळ दिसू शकते . त्यासह कसा हलका मेकअप करावा हे देखील आज आपण पाहणार आहोत.
1. गरम पाण्याचे वाफ घ्या . त्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने पाच मिनिटे तरी गोलाकार आकारात स्क्रबिंग करा.
2. त्यानंतर चेहऱ्यावर मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा लेप लावून डोळ्यावर गुलाब पाण्याच्या कापसाच्या पट्ट्या अवश्य ठेवा. आणि पंधरा मिनिटे शांत पॉवर नॅप घ्या.
3. चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला सूट होणारे टोनर अवश्य लावा.
4. पार्टीसाठी तुम्हाला कसा लूक हवा आहे त्यानुसार आणि तुमच्या कलेनुसार हलका मेकअप करू शकता. यावर आपण सविस्तर नंतर पाहूयात , परंतु तुमच्या आऊटफिटच्या रंगसंगतीनुसार आणि तुमच्या स्किन टोननुसार सूट होणारी छान लिपस्टिकची शेड आणि डोळ्यातील काजळ देखील तुमच्या सौंदर्यात भर पाडेल
5. हे देखील करायला तुम्हाला वेळ नसेल तर एक सोपी गोष्ट करा , तुम्ही जे फेस वॉश वापरतात त्यामध्ये अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा एकत्र करून चेहरा स्वच्छ धुऊन घ्या . तुम्हाला त्वरित रिझल्ट दिसून येईल.
6. ‘ पी हळद आणि हो गोरी…!’ असं कधीही होत नसतं . त्यामुळे क्षणार्धात चेहऱ्याचा पोत सुधारेल किंवा रंग खुलून दिसेल असे होणार नाही. म्हणून रोज पुरेसे पाणी पिणे, चेहरा थंड पाण्याने दिवसातून तीन वेळा स्वच्छ फेसवॉशने धुणे ,कोरडा करून त्यावर योग्य असे मोईश्चरायझर वापरावे म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही.