सौंदर्य विशेष:पावसाळ्यात अशी घ्या स्कीनची काळजी

202 0

सौंदर्य विशेष:ऋतू बदलला की ज्याप्रमाणे शरीरामध्ये बदल होत असतात त्याचा परिणाम हा तुमच्या चेहऱ्यावर सर्वप्रथम दिसून येत असतो पण प्रत्येकालाच सलोन मध्ये जाणे शक्य नसते मग अशावेळी पावसाळ्यामध्ये चेहऱ्याच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न पडत असतो यासाठीच आज तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात चेहऱ्यावर येणारे पिंपल तर रोखता येतीलच त्यासह चेहरा उजळ देखील दिसेल.

1.ऋतुमान कोणतेही असू द्या चेहऱ्याची त्वचा तुमच्या शरीरातील अशुद्धी स्पष्ट सांगत असते त्यामुळे पावसाळा असल्यामुळे तहान कमी लागत असेल तरी पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करू नका योग्य प्रमाणात शरीराची तहान भागेल एवढे पाणी अवश्य प्या

2.विशेष करून चेहऱ्याच्या त्वचेसाठी साबणाचा वापर करणे टाळा तुमच्या चेहऱ्याला सूट होणारे फेसवॉश वापरा किंवा घरी बनवलेले उठणे आणि जर तुमची त्वचा अधिक सेंसिटिव्ह असेल तर डाळीचे पीठ मसूर डाळीचे पीठ यामध्ये हळद घालून त्याचा उपयोग करा यामध्ये तुमची त्वचा जर ऑईली असेल तर त्यामध्ये दूध मिक्स करून त्या पेस्टचा चेहरा साफ करण्यासाठी वापर करू शकता

3.दिवसातून तीन वेळा चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे बाहेरून आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन कोरडा करा यासाठी खरखरीत रुमालाचा वापर करू नका

4.चेहरा स्वच्छ कोरडा केल्यानंतर त्यावर चेहऱ्याला सूट होणारे टोनर अवश्य वापरा

5.जमेल तेव्हा कस्तुरी हळद,आंबेहळद किंवा तुमच्या किचनमध्ये वापरली जाणारी हळद जरी घेतलीत तरीही चालेल.परंतु हळद हे त्वचेसाठी नैसर्गिक वरदान आहे. ज्यामुळे चेहऱ्याची त्वचा सतेज आणि निरोगी होण्यास नक्कीच मदत होईल.                              महत्त्वाचे म्हणजे चेहऱ्यावर जे कोणते सौंदर्यप्रसाधन वापरणार असाल ते तुमच्या त्वचेला सूट होते की नाही हे नेहमी तपासून पहा त्यानंतरच त्यांचा वापर थेट चेहऱ्याच्या त्वचेवर करा सामान्यतः कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी बाजारातील कोणती सौंदर्यप्रसाधने उपयोगी ठरतील याविषयी पुढील लेखात पाहूया…

Share This News
error: Content is protected !!