प्रियंका आणि निकचे ‘ते’ फोटो व्हायरल ; युजर म्हणाले ‘हे तुला अजिबात सूट करत नाहीये’…

518 0

प्रियंका चोप्रा ही बॉलीवूड आणि हॉलीवुड मध्ये एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयामुळे आजपर्यंत यशाची अनेक शिखरे सर केली आहेतच. त्यासह सौंदर्य क्षेत्रात देखील तिने मोठे नाव कमावले आहे. निक जोनस सोबत लग्न केल्यानंतर ती अमेरिकेमध्ये स्थिरस्थावर झाली आहे.

नुकताच निक जोनस याचा वाढदिवस तिने धूमधडाक्यात साजरा केला. एका हॉटेलमध्ये दिलेल्या शानदार पार्टीमध्ये ती एका लॉंग ब्लॅक आऊटफिटमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. बॅकलेस वन पीस ,मोकळे केस तिच्यावर शोभून दिसत आहेत. खरे पण तिच्या या फोटोमध्ये युजर्सनी मोठा फरक टिपला आहे.

प्रियंका आज-काल बरीच वेगळी दिसू लागली आहे. असं या फोटोमधून लक्षात येऊ शकतं. यावर यूजर्स म्हणतात की ,तिने तिचं वय लपवण्यासाठी बोटॉक्स ट्रीटमेंट केले आहे. जे तिला अजिबात सूट करत नाहीये. या फोटोमुळे सध्या प्रियंका मोठ्या प्रमाणावर ट्रोल होते आहे

Share This News
error: Content is protected !!