PATHAN : बेशरम रंग नंतर पठाणचे ‘झुमे जो पठाण’ गाणे रिलीज; तुम्ही पाहिले का ?

637 0

मुंबई : पठाण चित्रपटाच्या बेशरम रंग या गाण्याने प्रचंड मोठे यश मिळवले आहे. कारण काही असो शाहरुखचे चार वर्षानंतर कमबॅक, शाहरुखचा लाजवाब लुक, दीपिकाचा बोल्ड अवतार किंवा गाण्यामधील दीपिकाच्या भगव्या बिकनीवर उभे राहणारे विवाद असो… बेशरम रंग गाण्यातील म्युझिक, सिनेमेटोग्राफी कोरिओग्राफी यामुळे तरुणाईने तरी या गाण्याचा स्वागत धुमधडाक्यात केलं.

बेशरम रंग गाण्याने मिलियन्स मध्ये व्ह्यूज मिळवले. तर नुकताच पठाणचे दुसरे गाणे ‘झुमे जो पठाण’ रिलीज झाले आहे. अवघ्या एक दिवसांमध्ये या गाण्याने 22 मिलियन व्ह्यूज मिळवले आहे. या गण्यामध्ये देखील 57 वर्ष शाहरुख खानने कात टाकली आहे. याही गाण्यांमध्ये त्याचा लुक जबरदस्त तर आहेच, त्याला साथ दीपिकाच्या बोल्ड अँड ब्युटीफूल लूकची आहेच. गाण्याचे म्युझिक देखील सुंदर आहे. त्यामुळे तरुणाईनं या गाण्याला देखील चांगली पसंती दिली आहे.

या गाण्याला म्युझिक दिले आहे विशाल आणि शेखर यांनी, तर लिरिक्स आहेत कुमार यांचे, हे गाणे अर्जित सिंग, सुकृती कक्कर, विशाल आणि शेखर यांच्या आवाजात संगीतबद्ध झाले आहे. तर बॉस्को कैसर यांनी या गाण्याची डान्स कोरिओग्राफी केली आहे. हे गाणे नक्की पहा, आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!