HEALTH WEALTH : कितीही टेन्शन असुद्या… झोप शांत लागेल, पूर्ण झोप होईल, सकाळी ताजेतवाने वाटेल, फक्त करा हे घरगुती उपाय

496 0

रात्री शांत झोप लागत नाही , लवकर झोप लागत नाही किंवा सकाळी उठल्यावर पण ताजेतवाने वाटत नाही अशा समस्या अनेकांना असतात. पण या काही घरगुती उपायांनी तुम्हाला नक्की शांत झोप लागेल.

१. रात्रीचे जेवण ८ वाजताच करा. भूक नसेन तरी सर्वात आधी जेवणाचे टाईमटेबल बनवा आणि कटाक्षाने पाळा. त्यानंतर अंदाजे दीड तासाने दुधामध्ये शतावरी (उष्ण प्रकृतीच्या लोकांनी), तूप (ज्यांना शौचास साफ होत नाही), हळद (थंडीमध्ये उपयुक्त), सुकामेवा(वृद्ध आणि लहानमुलांसाठी खास) हे आपल्या प्रकृती नुसार घालून सेवन करा. रात्री १० नंतर कोणताही पदार्थ खाऊ नकाच.

२. तळपायाला तेल लावणे. कोणताही ऋतू असुद्या रात्री झोपताना पाय थंड पाण्याने स्वच्छ धुवा. कोरडे करून खोबऱ्याच्या तेलाने तापायला जमेल तास मसाज करा. कश्याची वाटी ने तळपाय खस्ता आले तर उत्तम… डोळ्यावर थंड गुलाब पाणी आणि कोरफड जेल एकत्र करून त्याच्या कापसाच्या पाट्या ठेवा. खूप शांत झोप येईल.

३. झोपताना मोबाइल डोळ्यासमोर घेऊ नकाच. अर्धा तास आधी तरी लांब ठेवा.

४. मनातली गोष्ट, दिवसभारतील कोणताही ताणतणाव असेन तर विश्वासाच्या माणसाकडे अवश्य व्यक्त व्हा. भलेही लगेच तोडगा मिळणार नाही , पण मन हलके होईल.

५. यात अनेक जण तक्रार करतात कि, लवकर झोप लागत नाही. डोक्यातील विचार, टेन्शन मुले अनेकांना निद्रानाश सारखे आजार देखील होतात. यावर एक उत्तम उपाय तुम्ही आस्तिक असाल तर आपण ज्या ईश्वरावर श्रद्धा ठेवतो त्याला मनातून साद घाला. जे काही ताण तणाव आहेत,त्यांचा सामना करायची मला ताकद दे. संकटातून बाहेर पाडण्यासाठी विवेकी बुद्धी दे. आम्हा सर्वांची रक्षा कर. असा त्या परमेश्वराला सांगा. मनावरचं ओझं अनेक पट्टीने कमी होईल. आणि जर तुम्ही नास्तिक असाल तर तुमच्या अंतर्मनाला साद घाला. कोणी तुमच्या बाबत कितीही वाईट वागले तरी तो त्याच्या कर्माची फळ भोगणारच. परमेश्वर न्याय करतोच. बाकी त्यावर सोडा. आणि मनस्ताप करावणाऱ्या विचारांना झटकून टाका.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!