कामाच्या वाढत्या ताणामुळे लोकांचे मानसिक संतुलन (Health Tips) बिघडत चालले आहे. यामुळे अनेक कोण प्रचंड तणावामध्ये असतात. कामाच्या नादात अनेक वेळा आपण स्वतःला कसलाच वेळ देत नाही. त्यामुळे कामेही व्यवस्थित होत नाहीत. त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर (Health Tips) होतो. या सगळ्यामधून अपराधीपणा, चिंता, स्वाभिमान गमावणे आणि स्वतःबद्दल नाराजी हे प्रकार घडत आहेत. आज आम्ही तुम्हाला तणाव दूर करण्याचे काही उपाय सांगणार आहोत ते केल्याने तुमचा तणाव तर दूर होईल तसेच तुमचे आरोग्यदेखील सुधारेल…
झोपेच्या बाबतीत तडजोड करु नका
दिवसभर काम केल्यानंतर झोपही भरपूर घेणे गरजेचे आहे. तुमच्या मानसिक आरोग्यासह एकूण आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे. झोप आणि मानसिक आरोग्य यांचा एकमेकांशी संबंध आहे. झोप पूर्ण झाली नाही तर मूड स्विंग, राग, दुःख यासारख्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे झोप घेणे खूप महत्वाचे आहे. 7 तासांपेक्षा कमी झोप मेंदूच्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही.
नियमित व्यायाम करा
घर असो किंवा ऑफिस कुठेही योग्य व्यायामासाठी वेळ काढा. सतत काम केल्याने पाठ, खांदे, कंबर आणि मानेवर परिणाम होतो. अशा स्थितीत व्यायामाशी मैत्री केल्यास शरीराला वेदनांपासून आराम मिळतो.
फोन वापरणे कमी करा
दिवसभर फोनमध्ये मग्न राहणेही मानसिक समस्या वाढवण्याचे काम करते. म्हणूनच केवळ अत्यंत महत्त्वाचे कॉल स्वीकारा. रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरल्यास त्याचा परिणाम थेट झोपेवर होतो. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर फोनकडे बघायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होतो.
जास्त काम करणं टाळा
जर तुम्हाला जास्त ओझे वाटत असेल तर कामाचा ताण टाळण्याचा प्रयत्न करा. मानसिक थकवा असल्याने कामावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. अशा परिस्थितीत स्वत:ची काळजी घेणे आवश्यक होते.