HEALTH WEALTH : काहीही आणि कितीही खा ! तरीही जाड होणार नाही…! फक्त जेवणानंतर करा ‘हा’ उपाय

602 0

HEALTH WEALTH : अनेक जणांना काही केल्या बारीक होता येत नाही. हलका आहार आणि अगदी कडक डायट फॉलो केले तरीही बारीक होणे शक्य होत नाही. तर अनेक जण असे असतात की अगदी काहीही खा… कितीही खा… ते जाड होतच नाहीत. याला कारण अर्थात मेटाबोलिझमचे दिले जाते. पण अगदी बारीक किंवा खूपच जाड असणे आरोग्यासाठी नक्कीच घातक आहे. त्यामुळे शरीर बळकट राहावे यासाठी तुम्हाला केवळ हा उपाय करायचा आहे.

हा उपाय आहे चालण्याचा ! आता अर्थात तुम्ही म्हणाल की केवळ चालल्याने वजन कमी कसे होईल ? किंवा तुम्ही कदाचित पुष्कळ चालत देखील असाल, पण त्याच्या योग्य वेळा आणि पद्धत तुम्हाला माहित आहे का ?

१. सकाळी तुमच्या अंगावर सूर्याची कोवळी किरण पडतील अशा वेळेत तुम्ही मॉर्निंग वॉकला जाणं तुमच्यासाठी खूप हितकारक ठरणार आहे. तुमची शरीरयष्टी कशीही असो शरीराला चालण्याचा हा व्यायाम खूप आवश्यक आहे. आणि ही वेळ खूप महत्त्वाची आहे.

See the source image

२. वेळेसोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉर्निंग वॉक कोणाशी तरी गप्पा मारत करू नका. यावेळी मध्यम वेगाने चाला. अगदी धावणे, अगदीच संथ चालणे ठेवण्यापेक्षा मध्यम वेग , ठेवून तोंड बंद ठेवून चला…! अर्थात तोंडाने श्वास घेऊ नका. म्हणूनच कुणाशी गप्पा मारत चालले अयोग्य, तो वेळ फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी द्याच.

३. रोज किमान तीन किलोमीटर चालले आवश्यक आहे. तुमचे वय पाहता त्यात कमी जास्त देखील करू शकता. हळूहळू अंतर वाढवू शकता अगदी पहिल्याच दिवशी तीन किलोमीटर चालले आवश्यक नाही.

४. हे झाले सकाळचे यामुळे तुमचे शरीर तर बळकट होईलच पण सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे जेवणानंतर शतपावली करणे. अनेक जण रात्री देखील फिरायला जातात. पण शतपावलीचा अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. शतपावली म्हणजे शंभर पावलं चालले. रात्रीचे जेवण झाल्यानंतर हमखास ही शंभर पावलं शांतपणे चालाच. दुपारच्या जेवणानंतर देखील लगेच कामाला बसणे टाळून थोडे चालल्यास उत्तम…

५. यामुळे पोट डंबारणे, एसिडिटी, वजन वाढणे, डायबेटीस अशा अनेक गंभीर आजारां पासून देखील तुम्ही दहा हात दूर राहाल.

Share This News
error: Content is protected !!