Constipation

Health Tips : हिवाळ्यात बद्धकोष्ठता आणि आंबट ढेकरपासून सुटका हवीय? एकदा ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा

492 0

आंबट ढेकर येणं म्हणजे पोट बिघडणं (Health Tips). जेव्हा एखादी व्यक्ती जास्त खाते किंवा वेगाने जेवते तेव्हा त्यांना आंबट ढेकर येण्यास सुरुवात होते. काही लोक आंबट ढेकर येण्याची तक्रार करतात. हे आंबट ढेकर अपचनामुळे होतात. अपचन, धूम्रपान, तणाव, कोल्ड ड्रिंक्स, मद्यपान केल्याने आंबट ढेकर येणे, पोटात आणि छातीत जळजळ होणे, उलट्या होणे, पोट फुगणे, घसा दुखणे यांसारख्या अनेक समस्या होतात. चला तर मग आज यावर आपण उपाय जाणून घेणार आहोत…

आंबट ढेकर आणि बद्धकोष्ठता पासून आराम कसा मिळवाल?
लिंबूपाणी – जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर आंबट ढेकर येणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर लगेच एक ग्लास पाण्यात लिंबू टाकून प्या. तुम्ही त्यात चिमूटभर मीठही घालू शकता. यामुळे तुमच्या पोटाला त्वरित आराम मिळेल.

बडीशेप आणि साखर – जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आंबट ढेकर येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर लिंबू पाणी आणि दही अजिबात खाऊ नका. यामुळे तुमच्या समस्या खूप वाढू शकतात. रात्रीच्या वेळी तीव्र ढेकर येत असल्यास, तुम्ही साखर आणि बडीशेप एकत्र खाऊ शकता. यामुळे तुम्हाला तात्काळ आराम मिळेल.

काळे मीठ – काळे मीठ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. आंबट ढेकर येत असल्यास काळे मीठ आणि जिरे एकत्र करून खाल्ल्यास त्वरित आराम मिळतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन रेडी; भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी ‘हे’ 10 शिलेदार तयार

Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Filmfare OTT Awards 2023 : ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023’ जाहीर

(टीप : वरील सर्व माहिती टॉप न्यूज मराठी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.याबाबत टॉप न्यूज मराठी कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या.)

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!