वाढता लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण अतिप्रमाणात सडपातळ (Underweight Health Issues) असणेदेखील धोकादायक ठरु शकते. या स्थितीत (Underweight Health Issues) पाच गंभीर आजारांचा धोका संभवतो. अशावेळी योग्य वजन किती असावे, हे जाणून घेऊया.
बॉडी मास इंडेक्स
बॉडी मास इंडेक्स हे एक शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर आहे. किलोग्रॅम मधील वजनाला मीटर मधील उंचीच्या वर्गाने भागले असता बॉडी मास इंडेक्स कळतो. 18 ते 25 हा नॉर्मल बॉडी मास इंडेक्स आहे. 25 ते 30 बॉडी मास इंडेक्सला वाढलेले वजन असे म्हणतात. 18 ते 25 पेक्षा कमी BMI असेल तर ते अंडरवेट आहेत असं म्हटलं जातं.
शरीरात पोषणाची कमतरता
गरजेपेक्षा जास्त सडपातळ असणे शरीरात पोषणाची कमतरता जाणवू लागते. या स्थीतीला कुपोषण असं म्हणतात. यात अशक्तपणा, थकवा येणे, केस गळती, कोरडी त्वचा, दात कमजोर होणे, यासारखी लक्षणे दिसू लागतात.
हार्मोन्स असंतुलित
कमी वजन असल्यास हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. ज्यामुळे वंध्यत्व वाढू शकते. यामुळे मुलांची वाढ थांबते आणि उंचीदेखील खुंटते. वजन वाढवण्यासाठी अंडी, केळी, फळे, भाज्या इत्यादींचा आहारात समावेश करा.
हाडे ठिसूळ होतात
न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता देखील होऊ शकते. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस रोग होऊ शकतो. यामध्ये हाडे ठिसूळ होऊन फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
रोगप्रतिकार शक्ती
वजन अति प्रमाणात कमी असल्यास रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते. ज्यामुळं वातावरणात बदल झाल्यास व्हायरस, बॅक्टिरियासारखे विषाणूची लागण झाल्यास लवकर आजारी पडतात.